आम्हा मित्रमंडळींमध्ये कोणते चॉकलेट उत्तम यावर चर्चा सुरु होती. ‘व्हाईट चॉकलेट ही अफवा आहे’, विदिशा म्हणाली. ज्याला सगळ्यांनीच दुजोरा दिला. ‘कोकोआ काही पांढरं नसतं त्यामुळे डार्क हेच खरं चॉकलेट’, असं निनादने ठामपणे म्हटलं.

ज्यावर सगळ्यांचंच एकमत होऊ पाहत होतं. त्यावर समीर म्हणाला, ‘एवढंच वाटतं लहानपणी ते लाल रॅपरमध्ये पार्लेचं जे चॉकलेट यायचं -किस्मि तेच खरं चॉकलेट’. समीरच्या या वाक्याला सगळ्यांनीच हसत दुजोरा दिला.

Health Special, Protein Supplements,
Health Special: बाजारातील प्रोटिन सप्लिमेंट्स – काय खरे, काय खोटे?
Which is better for controlling blood sugar
कलिंगड आणि टरबूज; मधुमेहींसाठी कोणते फळ खाणे आहे सुरक्षित? तज्ज्ञांचे काय आहे मत…
Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
how to make fish egg omelette Fish egg recipe in marathi
झटपट नाश्त्यासाठी बनवा “माशाच्या अंड्याचे ऑमलेट” लहान मुलंही खातील आवडीने

झर्र्कन मन बालपणात गेलं. चॉकलेट म्हटलं की सहज मिळणारं किस्मि आणि सोनेरी रॅपर डोळ्यासमोर दिसल्यावर इक्लेअर आणि मेलोडी हीच चॉकलेट्स डोळ्यासमोर येतात. वाढदिवस किंवा विशेष दिवस असेल तेव्हा गिफ्ट म्हणून जांभळ्या रंगात एक मोठ्ठं चॉकलेट दिलं जायचं -कॅडबरी!

साधारण ८०-९० च्या दशकात चॉकलेट म्हणजे चमकदार सोनेरी किंवा जांभळ्या रॅपरमध्ये गुंडाळलेली गोड आठवण!

हेही वाचा…Health Special : दही आणि योगर्टमध्ये नेमका काय फरक?

आहारशास्त्र अभ्यासताना चॉकलेट कोकोआच्या बियांपासून बनवतात हे कळलं आणि कोकोआचा मागोवा घेत मी चॉकलेट इतिहासात डोकावून पाहिलं तेव्हा इसवीसन पूर्व ४०० वर्षांपासून चॉकलेट हे आहारात समाविष्ट केलं जातंय हे लक्षात आलं. चॉकलेट हे खरं तर उच्चभ्रू वर्गासाठी खास भेट म्हणून दिलं जात असे.

चॉकलेट आणि त्याचे विविध प्रकार

चॉकलेट आणि कोकोआ बीन्सपासून बनणाऱ्या चॉकलेट्सचे विविध प्रकार आहेत. आणि हे प्रकार जाणून घेताना लहानपणी खाल्लेलं चॉकलेट हे नुसतंच कोकाआ बटरमध्ये बुडवलेलं साखरेचं बेट असा प्रश्न पडावा इतकं चॉकलेटचं वेगळेपण मला गवसू लागलं.

हेही वाचा…Health Special: खरूज का होते? काय काळजी घ्याल?

साधारण चॉकलेटचे ३ मुख्य प्रकार असतात

१. रुबी चॉकलेट

यात १.५ % कोकोआ सॉलिड , २.५ % दुधातील फॅट्स आणि १४% दुधातील स्निग्धांश असतात. याला कोणताही विशेष रंग नसतो

२. व्हाईट चॉकलेट

कोकोआ बीन्स अत्यल्प प्रमाणात असणारे हे चॉकलेट २० %, कोकोआ बटर , ३.५ % दुधातील फॅट्स आणि १४ % दुधातील इतर घन पदार्थ (मिल्क सॉलिड्स ) पासून बनलेले असते. या चॉकलेट्समध्ये सगळ्यात जास्त म्हणजे ५५ % इतकी साखर असते.

हेही वाचा…Health Special: काय खाण्याने अंतर्गत शारीरिक दाह कमी होतो? 

३. मिल्क चॉकलेट

चॉकलेटमधील मिल्क चॉकलेट हा सगळ्यात लोकप्रिय प्रकार आहे. यात १०% कोकोआ लिकर , ३-४% दुधातील फॅट्स आणि १२ % इतके दुधातील स्निग्धांश असतात. यात १४ ग्राम साखर आणि ५ मिलिग्रॅम कॅफिनदेखील असते.

४. डार्क चॉकलेट

चॉकलेट्सच्या सगळ्या प्रकारांपैकी सगळ्यात कडू असणारे चॉकलेट म्हणजे डार्क चॉकलेट. नावाप्रमाणेच त्यात गडदपणा आणणाऱ्या कोकोआचे प्रमाण ६० किंवा त्यापेक्षा जास्त असते. डार्क चॉकलेटमधील कोकोआच्या प्रमाणानुसार त्यातील कॅफिनचे प्रमाण देखील वाढत जाते. साधारण १३ ते २५ मिलिग्रॅमपर्यंत कॅफिन असणारे डार्क चॉकोलेटमध्ये साखरेचे प्रमाण अत्यल्प असते.

हेही वाचा…Health Special : जेट स्प्रे वापरताय…जरा सांभाळून! 

५. बेकिंग चॉकलेट

इतर चॉकलेट्सपेक्षा अतिशय वेगळी चव असणारे बेकिंग चॉकलेट रंगाने गडद , इतर कोणत्याही चॉकलेटपेक्षा चवीला कडू असते. यात कोकोआ लिकरचे प्रमाण सगळ्यात जास्त असते शिवाय साखर शून्य प्रमाणात असते.

बेकिंग चॉकलेटमध्ये साधारण २४ मिलिग्रॅम इतके कॅफिन असते आणि १५ ग्राम फॅट्स असतात.

चॉकलेटचे केक्स, ब्राउनी बनविण्यासाठी याचा प्रामुख्याने वापर केला जातो.

हेही वाचा…Health Special : कॅन्सरला दूर ठेवण्यासाठी ‘हे’ नक्की खा

जगभरात चॉकलेटचा वापर सध्या फंक्शनल फूड म्हणजे शरीरासाठी आवश्यक पदार्थ म्हणून केला जातो. ३० ग्राम किंवा त्याहून कमी चॉकलेटचे सेवन मेंदू, हृदय आणि त्वचेच्या आरोग्यासाठी पोषक मानले जाते.

चॉकलेट तयार करताना कोकोआ बीन्सवर अनेक प्रक्रिया केल्या जातात. या प्रक्रियेमध्ये कोकाआ बीन्समधून तयार होणाऱ्या स्निग्धांशामध्ये कॅटेचिन , अँथोसायनिडीन , प्रो-अँथोसायनिडीन यासारखे पॉलीफिनॉल्स असतात ज्याचा कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी, रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी , मेंदूंचं कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपयोग होतो. एका संशोधनात हे सिद्ध झालेले आहे की चॉकलेटमध्ये असणारे थिओब्रोमिन त्वचेच्या विकारांपासून रक्षण करते आणि चांगले कोलेस्टेरॉल वाढविण्यासाठी देखील मदत करते.

ज्या चॉकलेटमध्ये कोकोआचे प्रमाण कमी असते त्या चॉकलेटमध्ये बहुतांशी दूध, फॅट्स , साखर , प्रिझर्वेटिव्हस यांचे प्रमाण जास्त असते असे चॉकलेट नियमितपणे खाल्ल्यामुळे कॅलरीज , वजन आणि स्थूलपणा वाढीस लागतो.

हेही वाचा…Health Special: पालकत्वाची शिकवणी

त्यामुळे चॉकलेट खाताना ते जास्तीत जास्त कोकोबिन्स किंवा कोकोआ पावडर आहे की नाही हे नक्की आहे आवर्जून चेक करा आणि तुमच्या व्हॅलेंटाईनला उत्तम आरोग्य लाभेल असे चांगल्या दर्जाचे चॉकोलेट/तत्सम पदार्थ गिफ्ट करा !