सातत्याने निसर्गाच्या निकट सहवासात असलेल्या आपल्या बुद्धिमान पूर्वजांनी निसर्गाच्या निरीक्षणातूनच आयुर्वेदासारख्या शास्त्राच्या सिद्धान्तांची मांडणी केली. सृष्टीचे अवलोकन करताना मानवाच्या जीवनामध्ये ज्याला सर्वाधिक महत्त्व आहे, अशा उदय झाल्याबरोबर संपूर्ण सृष्टीला दृश्यमान करणार्‍या व अस्ताला जाताच सभोवतालचे जग दिसेनासे करणार्‍या सूर्याकडे द्रष्ट्या ऋषिमुनींचे लक्ष जाणे स्वाभाविकच होते. हाच सूर्य बीजातून आलेल्या लहानशा रोपाचे रुपांतर वृक्षामध्ये करतो, कणसातल्या कच्च्या दाण्याला पिकवतो, हिरव्या कैरीचे रुपांतर केशरी आंब्यात करतो, तलावात साठलेल्या पाण्याला आटवतो, हिरव्या रानाला सुकवून सोनेरी करतो, पृथ्वीवरच्या पाण्याची वाफ करतो आणि पुढे गोठलेल्या वाफेला उष्णता देऊन तिचे पावसाच्या थेंबांमध्ये रुपांतरण करतो…एकंदरच सृष्टीमध्ये रुपांतर करणारे-बदल घडवणारे-परिणमन करणारे तत्त्व म्हणजे सूर्य, हे त्यांच्या निरीक्षणास आले. सूर्याप्रमाणेच शरीरामध्येही रुपांतर करणारे-बदल घडवणारे-परिणमन करणारे तत्त्व म्हणजे पित्त. (चरकसंहिता १.१२.११)

सूर्य हे जसे अखिल विश्वाला उष्णता पुरवणारे, उर्जा निर्माण करणारे तत्त्व आहे त्याचप्रमाणे मानवी शरीराला उष्णता पुरवणारे, शरीरात उर्जा निर्माण करणारे तत्त्व म्हणजे पित्त.

Stridhan belongs to the woman husband has no right over it
स्त्रीधन महिलेचेच, त्यावर पतीचा अधिकार नाही…
Shani Maharaj Will Shower Money Job Growth To These Three Rashi
२०२५ आधी प्रगतीचं शिखर गाठतील ‘या’ राशी’; शनीच्या कृपादृष्टीने जगतील राजेशाही जीवन, धनलाभही होईल बक्कळ
Benefits Of Eating Poha With Lemon Juice And Kothimbir
पोहे बनवताना ‘हा’ पदार्थ वरून टाकायला अजिबात विसरु नका; प्रमाण किती हवं? चव वाढेलच पण हे फायदेही पाहा
Devendra Fadnavis, Ajit Pawar & Eknath Shinde Astrology
शिंदे, पवार, फडणवीसांना ‘या’ अंकाचा धागा ठेवतो जोडून; २०२४ मध्ये मात्र येईल ‘हा’ अडथळा, ज्योतिषी काय सांगतात?

यापुढे पित्त म्हटल्यावर छातीत जळजळ करणारे , घशामध्ये आंबट-कडू चव आणणारे ते पित्त असा अर्धवट अर्थ घेऊ नका. पित्त ही शरीरामधील उष्णतेचे तत्व आहे, हे समजून घ्या. प्रत्यक्षात पित्त हा शब्द ’तप सन्तापे पित्तं’असा तयार झाला आहे. ज्यानुसार शरीरामध्ये संताप (उष्णता) संबंधित असा पचनास, परिणमनास, परिवर्तनास कारणीभूत असणारा घटक म्हणजे पित्त.

हेही वाचा… Health Special: उपासाचं व्यवस्थापन

एखादा अन्नपदार्थ आहे त्या स्वरुपात शरीराला सात्म्य (अनुकूल) होऊ शकत नाही. आंबा,केळं अशी फळं,शेंगदाण्यासारख्या तेलबिया असे काही पदार्थ सोडले तर अन्य आहारीय पदार्थ आपण आहे त्याच स्थितिमध्ये खाऊ शकत नाही. आपण चिमणीसारखे गहू-तांदळाचे दाणे टिपून खाऊन पचवू शकत नाही वा कोल्ह्यासारखी कोंबडी पकडून तिला चावून खाऊ शकत नाही. कडक रताळे चावता येणार नाही वा मासा वा प्राण्याचे मांसही खाता येणार नाही. मानवाने खाण्यायोग्य समजलेल्या सर्वच पदार्थांवर अग्नीचे (उष्णतेचे) संस्कार करावे लागतात.अग्नीच्या त्या संस्कारानंतर त्या पदार्थांना अन्न म्हणता येते. परंतु ते अन्न सुद्धा सेवन केल्यावर, आहे त्याच स्वरुपात शरीरकोषांना उर्जा देऊ शकत नाही वा नवीन कोष तयार करू शकत नाही. त्या अन्नावर पुन्हा शरीरामध्ये उष्णतेचे संस्कार व्हावे लागतात, ज्याला आपण अग्नी म्हणतो. पित्त आणि अग्नी यांची कार्ये सारखीच आहेत, किंबहुना अग्नी पित्ताच्या माध्यमातूनच आपली सर्व कर्मे करत असतो. (चरकसंहिता १.१२.११)

सेवन केलेले अन्न आहे त्या स्वरुपात शरीराला सात्म्य(अनुकूल) होत नाही, त्यामध्ये बदल करावा लागतो. केवळ अन्नाच्याच नव्हे तर शरीरास उपयुक्त अशा बाह्य घटकाच्या स्वरुपावर, बाह्य घटकाच्या प्रत्येक रेणूवर शरीरातल्या विविध जैवरासायनिक प्रक्रियेमध्ये बदल (परिणमन) घडतात, तेव्हाच तर त्या बाह्य घटकाचे कण शरीराला अनुकूल होतात. हे परिणमन (conversion) करणारे, रुपांतर(transformation) करणारे, बदल(change) घडवणारे तत्त्व म्हणजे पित्त.

आपण जो आहार सेवन करतो त्यामध्ये परिणमन-रुपांतर-बदल करून तो शरीराला अनुकूल करणारे हे जसे पित्त, तसेच सेवन केलेल्या आहारापासून (पचनानंतर) तयार होणार्‍या आहाररसामध्ये परिणमन घडवून लाल रंगाचे रक्त तयार करणारे सुद्धा पित्त, डोळ्यात शिरणार्‍या प्रकाशकिरणांचे प्रतिमेमध्ये रुपांतर करून प्रतिमा तयार करणारेसुद्धा पित्त, सूर्यकिरणांपासून त्वचेखाली रंगद्रव्य बनवणारेसुद्धा पित्त आणि सूक्ष्म शरीरकोषांमध्ये उर्जेची निर्मिती करणारेसुद्धा पित्तच अशा वेगवेगळ्या स्वरुपामध्ये शरीरामध्ये पित्त म्हणजे उष्ण तत्त्व कार्यरत असते. शरीरातले हे उष्ण तत्व दुर्बल झाले की अनारोग्य होते आणि पूर्णपणे नष्ट झाले (अग्नी शांत झाला) की शरीर थंड पडते अर्थात मृत होते आणि ज्याच्या शरीरामध्ये उष्ण तत्त्व व्यवस्थित कार्यरत राहते अर्थात अग्नी उत्तम असतो त्याला निरामय दीर्घायुष्य प्राप्त होते.